माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्याने ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या स्पर्धेचं आयोजन करत आहे. दृक-श्राव्य आणि मनोरंजन विश्वात सृजनशील प्रतिभेला आणि नवोन्मेषाला वाव देणाऱ्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग म्हणून जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद – वेव्हज २०२५ मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. ही स्पर्धा कोणत्याही देशातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकची रचना आणि निर्मितीचा पूर्वानुभव असलेले कलाकार, संगीत रचनाकार, संगीतकार आणि सादरकर्ते यांच्यासाठी आहे. या संगीतमय स्पर्धेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेत ईडीएम चॅलेंजसाठी नावनोंदणी करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Site Admin | March 7, 2025 1:37 PM | WAVES 2025
वेव्हजमध्ये ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या स्पर्धेचं आयोजन
