वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिझ्युअल अँड एंटरटेनमेंट समिटमधे ईडीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे. यात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकमधील जागतिक प्रतिभा एकत्र आणल्या जातील. संगीताची निर्मिती आणि लाईव्ह परफॉर्मन्समधे नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता आणणं हा याचा हेतू आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहाय्याने भारतीय संगीत उद्योगानं याचं आयोजन केलं आहे. हा उपक्रम क्रिएट इन इंडियाचा भाग आहे. प्रसारण आणि इन्फोटेनमेंट, डिजिटल माध्यमं आणि नवोन्मेष, चित्रपट आणि AVGC XR या चार पायांवर व्हेव्हज आधारलेलं आहे. ईडीएम हे प्रसारण आणि इन्फोटेनमेंट विभागाचा एक भाग आहे.
Site Admin | February 19, 2025 9:01 PM | WAVES 2025
WAVES: इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज
