क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत वेव्हज परिषदेत ॲनिमेशनपट बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स तसंच एक्सटेंडेड रियालिटी असे घटक यात समाविष्ट असतील. जगभरातल्या ॲनिमेशनपट निर्मात्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून आतापर्यंत १ हजार २९० अर्ज दाखल झाले आहेत. यात १९ आंतरराष्ट्रीय निर्मात्यांचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.
Site Admin | March 11, 2025 3:52 PM | WAVES | WAVES 2025
वेव्हज परिषदेत ॲनिमेशनपट बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन
