डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवणार – मंत्री पंकजा मुंडे

सांडपाण्य़ाचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा बनवणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. आयआयटी पवई इथं ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि शाश्वत उपाययोजना’ या विषयावर  परिषद आयोजित केली होती, यात त्या बोलत होत्या. नद्यांच्या काठावरल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येईल, असं मुंडे यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा