डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 7, 2024 2:19 PM | INS tabar

printer

युद्धनौका INS तबर चा भूमध्य समुद्रात भारत-फ्रान्स बाविसाव्या द्विपक्षीय सराव वरुणा मध्ये भाग

भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका INS तबरनं भूमध्य समुद्रात भारत-फ्रान्स बाविसाव्या द्विपक्षीय सराव वरुणा मध्ये भाग घेतला. भारतीय नौदलाचं प्रतिनिधित्व जहाजावरील हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं, तर फ्रेंच बाजूचं प्रतिनिधित्व विविध विमानं आणि हेलिकॉप्टर्सद्वारे करण्यात आलं. वरुणा सरावामध्ये सहयोगात्मक प्रयत्नांद्वारे आंतरकार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेनं भारतीय आणि फ्रेंच नौदलांनी वचनबद्धता प्रकट केली. भारत-फ्रान्स संबंध भक्कम करण्यासाठी 2001 मध्ये वरुणा हा द्विपक्षीय सराव सुरू झाला आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या दिशेने आजवरच्या वर्षांमध्ये लक्षणीयरित्या प्रगती झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा