डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होणार

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन झालेली संसदेची संयुक्त समिती आपला अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल, अशी अपेक्षा केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजुजु यांनी व्यक्त केली. समितीला एक कोटीपेक्षा जास्त निवेदनं प्राप्त झाली असंही रिजुजु यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूूर्ण झाल्याबद्दल रिजुजु दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. संयुक्त समिती विविध सरकारी आणि खासगी संस्थांकडून सूचना मागवत असून यावर व्यापक चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. वक्फ कायद्यात याआधीही बदल झाले आहेत, मात्र यावेळी व्यापक चर्चा केली जात असून हे लोकशाहीसाठी चांगलं असल्याचं ते म्हणाले. 

सरकारच्या या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त यावर्षी दिल्लीत लोकसंवर्धन पर्व आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे अल्पसंख्य समूदायातल्या कारागिरांना आपल्या हस्तकला आणि हातमागावर उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन करता येणार आहे अशी माहिती रुजुजु यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात अडीच लाख लाभार्थ्यांना एक हजार  कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा