लोकसभेत सादर केलेलं नवीन प्रस्तावित वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं असल्याचा आरोप राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख यांनी केला आहे. ते आज नागपुरात जमाते इस्लामी हिंदनं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते.
या दुरुस्ती विधेयकात असंवैधानिक तत्वांचा अंतर्भाव केला आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय वक्फ परिषद गठन करताना बिगरमुस्लिम सदस्यांचा समावेश, वक्फच्या जमिनी या महसूल जमिनी म्हणून घोषित करण्याचा जिल्हाधिकार्यांना अधिकार, तसंच वक्फ देणाऱ्या व्यक्तीसाठी इस्लामचं पाच वर्षांच पालन अशा तरतुदी या विधेयकात असून, त्या जाचक असल्याचं रऊफ शेख यांनी यावेळी सांगितलं. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी सदस्य अब्दुल पारेखही यावेळी उपस्थित होते