वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन झालेल्या संसदेच्या संयुक्त समितीनं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पुढच्या बैठकीला हजेरी लावायला मनाई केली आहे. संसदेत आज झालेल्या बैठकीत बॅनर्जी यांनी गैरवर्तन केल्यानंतर हा निर्णय झाला. भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यासोबत बॅनर्जी यांचा वाद झाला, त्यानंतर त्यांनी गैरवर्तन केल्याचं सुत्रांनी सांगितलं. ओडिशातल्या काही संघटना आणि इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीगच्या खासदाराचं म्हणणं ऐकून घेताना हा प्रकार घडला.
Site Admin | October 22, 2024 8:36 PM | Kalyan Banerjee | Waqf (Amendment) Bill 2023
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पुढच्या बैठकीला हजेरी लावायला मनाई
