मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नावे करण्याला या बैठकीत मान्यता मिळाली.
वानखेडे स्टेडीयम मधे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आधीपासूनच आहेत.