मुंबईत असलेल्या वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सोहळ्याची सुरुवात १२ जानेवारीला होईल तर समारोप १९ जानेवारीला होणार आहे. यावेळी वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाच्या विशेष लोगोचं अनावरण होणार आहे. १९ जानेवारीला एक स्मृती टपाल तिकीट आणि एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सोहळ्यासाठी आजी माजी दिग्गज क्रिकेटपटू एकत्र येतील असं नाईक यांनी सांगितलं.
Site Admin | December 19, 2024 6:52 PM | wankhede stadium