महायुती सरकारने सरकारी तिजोरीत खडखडाट केला, कर्ज आणून नव्या योजना आणल्या असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना केला. मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयऱ्याना आरक्षण देण्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं ते म्हणाले. राज्यात सरकारने दावा केल्याप्रमाणे रोजगानिर्मिती झालेली नाही. लोकांच्या या फसवणुकीला जनतेच्या दरबारात तोंड द्यावं लागेल, असं वडेट्टीवार म्हणाले.
चातुर्वर्ण्य या राज्यात पुन्हा येता कामा नये, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन संविधानानुसारच ते चालवले गेले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.
गुजरातचे ड्रग्ज राज्यात आणून , प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढवून , राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम राज्य सरकारनं राज्याची प्रतिमा खराब केली आहे असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.