उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथल्या भूविज्ञान वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन झालं. भूविज्ञान क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हे वस्तुसंग्रहालय एक उत्तम अनुभव ठरेल, अशी त्याची रचना आहे. यात अंटार्क्टिक खडक, दुर्मिळ रत्न, जपानमधला ज्वालामुखीय खडक, हिमालयीन जीवाश्म, डेक्कन ट्रॅप झिओलाइट्स, मितीय दगड आणि डायनासोरची अंडी यांचा समावेश असलेला असाधारण खजिना आहे.
उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराज श्रीमंत जिवाजीराव शिंदे यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील झालं.