डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 11, 2025 8:18 PM | Jagdeep Dhankhad

printer

परीक्षा आणि मुलाखती पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे दिसलं पाहिजे-उपराष्ट्रपती

परीक्षा आणि मुलाखती या पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे दिसून आलं पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज बंगळुरू इथं राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या २५ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले.  कुठल्याही प्रकारच्या पक्षपातापासून मुक्त असावा यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करणं ही देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांची दूरदृष्टी होती, असं धनखड म्हणाले. नोकरशहा आणि राजकारण्यांकडून आपल्या जोडीदारासाठी उच्च पदं मिळवण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचं सांगत निवृत्तीनंतरच्या पदनियुक्तीवरही उप राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. नोकर भरती प्रक्रियेत परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा