डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीची तयारी पूर्ण

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या होणारं मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावं यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या ७ जिल्ह्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. ४० जागांपैकी १६ जागा काश्मीर विभागात तर २४ जागा जम्मू विभागात आहेत. या अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यात ३९ लाख १८ हजारांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा