झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी २२५ संवेदनशील मतदान केंद्रांसह एकूण १५ हजार ३४४ मतदान केंद्र उभारली आहेत. सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या तैनात आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी ५ या कालावधीत मतदान होईल. आसाम विधानसभेच्या पाच, बिहार विधानसभेच्या चार, कर्नाटकातल्या ३ जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
Site Admin | November 12, 2024 8:27 PM | Jharkhand Vidhansabha Election 2024 | झारखंड