विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होईल. या मतांची मोजणी १ जुलै रोजी होणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात ८, कोकण पदवीधरमध्ये १३, नाशिक शिक्षकमध्ये २१ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत.