देशातल्या 9 राज्यांतल्या 12 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. राज्यातल्या 2 जागांचा यात समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी या महिन्याच्या 14 तारखेला अधिसूचना जारी होईल. 22 तारखेला अर्जांची छाननी होईल. 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे. राज्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे