जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३५ वर्षातल्या सर्वाधिक ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व २४ मतदारसंघात काल शांततेत मतदान झालं. किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली आणि पुलवामामध्ये सर्वात कमी सुमारे ४७ टक्के मतदान झालं.
युवा आणि महिला मतदार मोठ्या संख्येनं या मतदानात सहभागी झाले होते. बहिष्कार आणि दहशतवादाला मतदारांनी मतदान यंत्रातून उत्तर दिल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी निवडणूक प्रक्रियेतल्या या विक्रमी सहभागाबद्दल मतदारांचं अभिनंदन केलंय.