जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीतपणे पार पडावी यासाठी राज्यातील सात जिल्ह्यातील ४० मतदार संघात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ आहे. सर्व मतदान केंद्र प्राथमिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून २० हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये ५ हजार ६० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात ३९ लाखाहूंन अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी १८ आणि २५ सप्टेंबर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात ६१% आणि दुसऱ्या टप्प्यात ५७ % मतदानाची नोंद झाली. या सर्व टप्प्यांची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.
Site Admin | October 1, 2024 10:51 AM | Elections | Jammu and Kashmir