अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी साडे पाच ते साडे नऊ दरम्यान मतदान होईल. मतदान बंद होताना निवडणुकीचे निकाल अपेक्षित असले तरी याचा अंतिम निर्णय काही दिवसानंतर होईल. तत्पूर्वी टपाली मतदानाने अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवलं आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात ही लढत होईल. या दोघांनीही निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला २७० इलेक्टोरल कॉलेज मतांची आवश्यकता असते. ॲरिझोना, नेव्हाडा, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्विनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जिया या राज्यांमधल्या निकालांनंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Site Admin | November 4, 2024 8:18 PM | Election | US