दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३३ पूर्णांक ३१ शतांश टक्के मतदान झालं आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगानं १ लाख ८० हजारापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले आहेत.
या निवडणुकीत अनेक प्रमुख नेत्यांचं राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. यात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि मंत्री गोपाल राय, भाजपचे विजेंदर गुप्ता, परवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि कैलाश गहलोत यांचा समावेश आहे.
Site Admin | February 5, 2025 4:13 PM | दिल्ली विधानसभा | निवडणुक | मतदान
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू
