अमेरिकेत मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. सहा राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालं आहे. इंडियाना, केंटुकी, व्हर्मॉंट, व्हर्जिनिया, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही राज्यांमध्ये मतमोजणीही सुरू आहे. प्राथमिक कलांनुसार इंडियाना, पश्चिम व्हर्जिनिया, फ्लोरिडा, केंटकी आणि दक्षिण कॅरोलिनात डोनाल्ड ट्रंप पुढे आहेत. वर्मोंटमध्ये कमला हॅरिस विजयी होतील असं प्राथमिक कलांमधून स्पष्ट झालं आहे. डोनाल्ड ट्रंप यांना आत्तापर्यंत 168 इलेक्ट्रोरल मतं, तर कमला हॅरीस यांना 81 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अध्यक्षपद मिळवण्यासाठी एकंदर 538 इलेक्ट्रोरल मतांपैकी 270 इलेक्टोरल मतं मिळवणं गरजेचं असणार आहे.