डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियान सुरु

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना करण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
“आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातल्या विशेषतः शहरातल्या मतदानाची टक्केवारी अतिशय चिंताजनक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला ही चिंता वाटली पाहिजे की या पद्धतीने जर मतदानाची टक्केवारी कमी होत गेली तर लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.’’
केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक माधव जायभाये यांच्यासह जिल्ह्याचे मतदान जनजागृती विषयी आयकॉन असलेले प्रेषित रुद्रवार, अर्चना गायकवाड, श्रेयस यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा