डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला पुण्यात प्रारंभ

कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला न घाबरता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेचा विकास आणि समृद्धीसाठी कसा करता येईल, यादृष्टीने विचार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

 

मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. याच मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं ते म्हणाले. मराठी भाषेची सेवा आम्ही कार्यकर्त्याच्या भावनेतून व्यक्त करत आहोत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोकणात आणि पुढे परदेशात देखील हे संमेलन आयोजित केलं जावं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. 

 

या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या असे कार्यक्रम होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा