जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण या विषयावर आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आभासी बैठक झाली. माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी गर्भधारणेत योग्य अंतर आणि आरोग्यपूर्ण कालावधी ही या बैठकीची संकल्पना होती. या कार्यक्रमात नड्डा यांनी कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सुगम’ या बहुउद्देशीय प्रदर्शन मॉडेलचं अनावरण केलं. यावेळी रेडिओ संदेश आणि जिंगल्स देखील प्रसिद्ध करण्यात आल्या. कुटुंब नियोजना बाबत जागरूकता वाढवणं आणि कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर वाढावा, यासाठी सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, असं नड्डा यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | July 11, 2024 8:29 PM | World Population Day