विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपानं आज मागे घेतलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अपक्ष लढत त्यांनी विजय मिळवला होता. गेल्या ५ वर्षात अग्रवाल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. यंदा विनोद अग्रवाल यांना महायुती गोंदियातून उमेदवारी देणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी सांगितलं.
Site Admin | October 7, 2024 7:13 PM | BJP | Vinod Agarwal
विनोद अग्रवाल यांचं निलंबन मागे
