डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पैलवान विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध संयुक्त जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडे नोंदवल्याची माहिती क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्र सरकार महिला पैलवानांना सर्व प्रकारची मदत देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मुद्द्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्याशी चर्चा केली असल्याचं त्यांनी निवेदनात सांगितलं. या परिस्थितीत आपल्याकडे काय पर्याय आहेत, याची चाचपणी करण्याची सूचना संघटनेला दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

 

विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी.टी. उषा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय कुस्ती महासंघानं जागतिक कुस्ती संघटनेला अपात्रतेच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाद मागितली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटना या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून विनेशला सर्व सहकार्य केल जात असल्याचंही त्या म्हणाल्या.

 

दरम्यान, पॅरिस ऑलिंपिकमधल्या भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी विनेश हिचं वजन १०० ग्रॅमनं जास्त भरल्याचं म्हटलं आहे. वजन कमी व्हावं यासाठी सर्व उपाययोजना केल्या होत्या असंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा