‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आजपासून सुरुवात होत आहे. विकसित भारताच्या निर्माणाकरिता, तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून द्यावं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. देशभरातून सुमारे 30 लाख युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला असून आजच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एकंदर तीन हजार युवक युवतींची निवड करण्यात आली आहे. विकसित भारताशी निगडीत विषयांवर सादरीकरण आणि स्पर्धांमध्ये हे युवा सहभागी होतील.
Site Admin | January 10, 2025 1:04 PM | Viksit Bharat Young Leaders Dialogue 2025
‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२५’ला आजपासून सुरुवात
