डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 20, 2024 8:56 AM

printer

देशाप्रती असलेला कर्तव्यभाव विकसित भारताच्या दिशेने घेऊन जाईल – मंत्री मनसुख मांडवीय

देशाप्रती असलेला आपला कर्तव्यभावंच आपल्याला विकसित भारताच्या दिशेने घेऊन जाईल असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल पुण्यात व्यक्त केला. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकसित भारत मोहिमे अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रमाचं काल पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पॅरिस ऑलम्पिकमधील कास्य पदक विजेता स्वप्नील कुसळे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा