अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा केला होता तसंच दिसनायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत, अशी माहिती परराष्ट्रव्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. दोन्ही राष्ट्रांमधले बंध दृढ असल्याचं यावरुन दिसून येतं असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांचा हा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
Site Admin | April 5, 2025 7:13 PM | Anura Kumara Dissanayake | Prime Minister Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा-विक्रम मिस्री
