कोरेगांव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान आणि ७५० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना तिथल्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार केलं आहे. आज आणि उद्या कोरेगाव भिमा इथं बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचं पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा प्रशासनानं उपलब्ध करुन दिल्या आहेत.
Site Admin | December 31, 2024 3:37 PM
कोरेगांव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन सज्ज
