कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.