मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय हा विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. याप्रकरणी हक्कभंग दाखल करणार असल्याचं ते म्हणाले. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. अर्थसंकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया डावलून हा शासन निर्णय काढल्याचं वडेट्टीवार म्हणाले. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन चालकांना परवाने देताना होणाऱ्या घोटाळ्यांचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी योग्य उपाययोजना करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली.
Site Admin | June 29, 2024 7:01 PM | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | विजय वडेट्टीवार | विधानसभा | विधीमंडळ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा विजय वडेट्टीवार यांचा दावा
