दहशतवाद्यांना जात धर्म नसतो असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. वडेट्टीवार यांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
पहलगाम इथं हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हेतू देशातल्या नागरिकांमधे फूट पाडणं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. भारताच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढणं आवश्यक आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर बावनकुळे यांनी टीका केली आहे.