अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. या करता अशी नेमणूक करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, असं वडेट्टीवार म्हणाले. सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालणार तसंच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असं आश्वासन अध्यक्षांनी यावेळी दिलं.