डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 16, 2024 1:46 PM | VIJAY DIWAS

printer

आज देशभरात ‘विजय दिवस’ साजरा

विजय दिवस आज साजरा होत आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत ९३ हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्त शरणागती पत्करली, दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली. यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली.

 

या विजयाची आठवण म्हणून आज देशभरात सैन्यदलाच्या छावण्यांसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या युद्धात शौर्य गाजवलेल्या सैनिकांचं सामाजिक माध्यमावरून स्मरण करत, हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा