डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रण धीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान त्याना धोरणात्मक भागीदारीचं स्वरूप देण्यात आलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा