महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा 7 लाख 20 कोटी रुपयांचा आणि सुमारे 45 हजार 891 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला.
आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा पाच लाख 60 हजार 964 कोटी रुपये तर महसुली खर्च सहा लाख सहा हजार 855 कोटी रुपये अंदाजित असल्याचं, या अर्थसंकल्पात म्हटलं आहे. शेती, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पत भरीव तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचं नवीन औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.