डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्‌मयीन पुरस्कार आज जाहीर झाले. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान` या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार दीपक घारे यांच्या ‘सैय्यद हैदर रक्षा -एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास’ या पुस्तकाला मिळाला आहे. डॉ.मा.गो.देशमुख स्मृती संतसाहित्य लेखन पुरस्कार डॉ.अलका चिडगोपकर यांना आणि पु.ल. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. याशिवाय डॉ.पद्मरेखा धनकर, संजय आर्वीकर, श्रीकांत बोजेवार आणि राधा मंगेशकर यांचाही विजेत्यांमध्ये समावेश आहे. येत्या १४ तारखेला विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा