महाराष्ट्रात विदर्भ, पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश, ओदिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशात आज अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये उद्यापर्यंत, तर झारखंड, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला आणि डोंगराळ प्रदेश,बिहार आणि ईशान्य भारतात पुढले ४ दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
दक्षिण भारतात केरळ, माहे, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी प्रदेशातही पावसाची अशीच स्थिती कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.