भारतीय लष्कराच्या दक्षिण कमान मुख्यालयाने आयोजित केलेली विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन आज अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली. हिवरेबाजार इथून सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून पुढे मार्गस्थ करण्यात आलं. हिवरेबाजार ते अहिल्यानगर किल्ल्यापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचा जिल्हास्तरीय समारोप अहिल्यानगर किल्ला परिसरात करण्यात आला.
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातल्या भारतीय सैन्याच्या विजयाचं स्मरण करण्यासाठी आयोजित ४०५ किलोमीटर प्रवासाच्या या मॅरेथॉनची सुरुवात ६ डिसेंबरला मुंबईतून झाली होती. तिचा समारोप पुढच्या वर्षी १६ जानेवारीला पुण्यात होणार आहे.