डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 13, 2024 11:03 AM | Victory Day

printer

भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा

भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा ५३ वा वर्धापनदिन येत्या 16 तारखेला साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दाखवण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तर १५  डिसेंबर रोजी “एक शाम वीरों के नाम” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सारागडीच्या युद्धावरील कार्यक्रम तसच भारतीय सैन्याचा समृद्ध वारसा दर्शविणारी लघुफित यावेळी दाखवली जाणार आहे. या युद्धादरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना बँड पथकाच्या कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा