उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे काल रात्री उशिरा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स मध्ये दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. कार्डिओलॉजि विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली ते असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन धनखड यांची विचारपूस करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Site Admin | March 9, 2025 3:37 PM | Vice President Jagdeep Dhankhar
उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल
