देशातल्या नागरिकांच्या स्थलांतरावर आणि धर्मांतरावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टीका केली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात सापडेल असा इशारा त्यांनी दिली. मुंबईत मुरली देवरा स्मृती संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकशाहीमध्ये संवाद आवश्यक असल्याची गरज त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. देशातल्या अनेक संस्थांचं खच्चीकरण होत आहे. त्याकडे राजकारण्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं ते म्हणाले. संसदेत कुठल्याही विचारसरणीच्या पलीकडे संवाद झाला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.