भारतात एकेकाळी ज्ञानाची केंद्रं म्हणून कार्यरत असलेल्या नालंदा, तक्षशीला अशा महत्त्वाच्या विद्यापीठांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं, असं आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. मुंबईत के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाजपरिवर्तनासाठी महत्त्वाचे घटक आहेत, असं सांगून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण जीवनाचा कायापालट घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, हिंदुजा समूह आणि महाविद्यालयाचे पदाधिकारी, अध्यापकवर्ग आणि इतर यावेळी उपस्थित होते. विविध विभागांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आला. तसंच एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत उपराष्ट्रपती धनखड आणि राज्यपाल राधाकृष्णन यांनी वृक्षारोपणही केलं.
Site Admin | March 1, 2025 7:16 PM | Vice President Jagdeep Dhankhar
महत्त्वाच्या विद्यापीठांच्या पुनरुज्जीवनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त
