महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात प्रथमच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या महिला अनेक आव्हानांना सामोऱ्या जात असून त्या युद्ध करण्यासाठी सुरक्षा दलात देखील सहभागी होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. कामाच्या ठिकाणी आणि इतर जागी महिलांबाबत होत असलेल्या भेदभाव कमी करण्यासाठी महिला आयोगानं काम करावं, असं ते म्हणाले.
Site Admin | January 31, 2025 2:46 PM | Vice President Jagdeep Dhankhar
महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
