उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातल्या ४३४ आयटीआय संस्थांमधे उभारण्यात आलेल्या संविधान मंदिरांचं उद्घाटन करणार आहेत. उद्या दुपारी उपराष्ट्रपती नागपूर इथं पोहोचतील. नागपूरच्या रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन त्यांच्या सोबत असतील.
Site Admin | September 14, 2024 8:29 PM | Vice President Jagdeep Dhankhad
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
