उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
Site Admin | December 3, 2024 8:24 AM | Vice President Jagdeep Dhankhar