डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उपराष्ट्रपतींची राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट

नागरिकाची राष्ट्रवादाशी घट्ट बांधिलकी असल्याशिवाय कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिल्यानंतर बोलत होते. 

 

भारताच्या विकासाकरता नागरिकांचा राष्ट्रवाद आणि संघटन तसंच राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन आवश्यक आहे. देशाचा कायापालट हा  सामाजिक ऐक्य, तळागाळात रुजलेली देशभक्तीची मूल्य, पर्यावरणविषयक जागृती, स्वावलंबन आणि नागरी कर्तव्य या पाच स्तंभांवर आधारित आहे. या पाच स्तंभांची आठवण ठेवत  भारतीय नागरिकांनी तसंच युवकांनी भारताला एक स्वाभिमानी देश म्हणून नावारूपाला आणावं, असं आवाहन  धनखड यांनी यावेळी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा