डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, तसंच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सर्व शाखांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेच्या शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन, तसंच संस्थेनं विकसित केलेली दोन नवी तंंत्रज्ञानं आणि संस्थेच्या कामाशी संबंधित तीन पुस्तकांचं प्रकाशनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, या खात्याचे राज्यमंत्री रामनाथ ठाकुर, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, संस्थेचे पदाधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा